महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण, नवीन शस्त्रास्त्रांसाठी १ लाख १० हजार ७३४ कोटी - Budget 2020 Latest Updates

संरक्षण दलांचे आधुनिकीकरण आणि नवीन शस्त्रास्त्रे यासाठी १ लाख १० हजार ७३४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

defense, Budget2020
defense, Budget2020

By

Published : Feb 1, 2020, 3:44 PM IST

Updated : Feb 1, 2020, 4:58 PM IST

नवी दिल्ली- लष्करासाठी अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या तरतुदींमध्ये संरक्षण दलांचे आधुनिकीकरण आणि नवीन शस्त्रास्त्रे यासाठी १ लाख १० हजार ७३४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यावेळी १० हजार ३४० कोटी रुपये यासाठी अधिक दिले गेले आहेत.

संरक्षण दलाच्या बजेटमधील १.३३ लाख कोटी रुपये हे निवृत्त सैनिकांच्या पेन्शनसाठी खर्च होणार आहेत. पेन्शनसाठी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात १.१७ लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती.

हेही वाचा -५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त; मध्यमवर्गाला दिलासा

हेही वाचा -देशात २० लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देणार - अर्थमंत्री

संरक्षण दलाच्या एकूण बजेटमध्ये यावेळी ६ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ३.३७ लाख कोटींची यंदा तरतूद करण्यात आली असून गेल्या वर्षी अर्थसंकल्पात ३.१८ लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती. संरक्षण आणि पेन्शन मिळून एकत्रित विचार केल्यास ४.७ लाख कोटी एकूण बजेट होते.

Last Updated : Feb 1, 2020, 4:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details