नवी दिल्ली- कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी प्राप्तीकर विभाग करदात्यांवर विविध मार्गातून नजर ठेवते. एवढेच नव्हेतर करदात्याच्या सोशल मीडियावरही प्राप्तीकर खाते नजर ठेवते, असा अनेकांचा समज आहे. प्रत्यक्षात हा गैरसमज असल्याचे सीबीडीटीचे अध्यक्ष पी.सी.मोदी यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) संचालक पी.सी.मोदी म्हणाले, प्राप्तीकर विभागाला अघोषित संपत्ती जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर नजर ठेवण्याची गरज नाही. कारण इतर मार्गातून माहिती आणि डाटा विविध संस्थांमधून मिळत असल्याचे मोदी यांनी सांगितले. करदात्याचे उत्पन्न आणि खर्चाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी त्याचे फेसबुक, ट्विटर आणि इनस्टाग्राम पाहिले जाते,का असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
मोदी म्हणाले, प्रत्यक्षात आम्ही प्रवास खर्चाची माहिती अधिकृत स्त्रोताकडून मागवितो. सीबीडीटीने अद्ययावत डाटा अॅनालिटिक्स व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे कोणत्या क्षेत्रावर कर लावायचा आहे अथवा कोणत्या क्षेत्राला दिलासा द्यायचा आहे, हे समजू शकते. या नव्या व्यवस्थेचे 'प्रोजेक्सट इनसाईट' असे नाव आहे. त्यामुळे संपूर्ण आर्थिक व्यवहाराची माहिती सीबीडीटीला मिळू शकते.