नवी दिल्ली- केंद्र सरकारने २०२५ पर्यंत ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र प्रत्यक्षात औद्योगिक विकास घसरत आहे. औद्योगिक उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक घसरल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसून आले. खाण व उत्पादन क्षेत्राची सुमार कामगिरी झाल्याने औद्योगिक उत्पादन क्षेत्रात घसरण झाली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक ३.१ टक्के नोंदविण्यात आला आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) हा मे २०१८ मध्ये ३.८ टक्के होता. चालू वर्षात एप्रिलमध्ये ४.३ टक्के आयआयपी होता. तर मार्चमध्ये ०.४ टक्के होता. खाण क्षेत्राचा विस्तार (एक्सपांड) मे महिन्यात ३.२ टक्के होता. तर गतवर्षी मे महिन्यात ५.८ टक्के खाण क्षेत्राचा विस्तार होता. मे महिन्यात तर उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक हा मे महिन्यात २.५ टक्के होता. गतवर्षी मे महिन्यात उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक हा ३.६ टक्के होता.