नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्यासाठी भाजपमधील चार महत्त्वाच्या नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विविध माहिती व सूचना दिल्या आहेत. यामध्ये भाजपचे गोपाळ अग्रवाल, डॉ. सय्यद झफर इस्लाम, नरेंद्र तनेजा व अमित मालवीय यांचा समावेश आहे.
- १. गोपाळ कृष्णा अग्रवाल
भाजप प्रवक्ते गोपाळ अग्रवाल यांनी उद्योग आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांमध्ये समन्वय साधण्याचे काम केले आहे. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेर्सचे (आयआयसीए) संचालक आहेत. यापूर्वी ते बँक ऑफ बडोदाचे माजी संचालक होते. अर्थसंकल्प तयार करताना त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पक्षाने प्रथमच उद्योगांचे तज्ज्ञ आणि प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. भाजपने अशा ११ बैठका घेतल्या आहेत. अग्रवाल या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. याबाबत बोलताना अग्रवाल म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी प्रत्येकाचे संयमाने आणि नोंद घेत ऐकून घेतले आहे. चालू वर्षात सुमारे विविध क्षेत्रातील २०० जणांनी बैठकीत भाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.
- २. डॉ. सय्यद झफर इस्लाम
भाजपचे दुसरे प्रवक्ते हे डटेच बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांच्याकडे भाजपने अर्थसंकल्पासाठी माहिती देण्याची जबाबदारी सोपविली आहे. ते सध्या एअर इंडियाचे संचालक आहेत. काम करण्यासाठी साचेबद्ध यंत्रणा नसते. अर्थसंकल्पासाठी व्हिजन काय आहे, हे पक्षांतर्गत सांगण्याची जबाबदारी त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सोपविली आहे. अर्थसंकल्प हा ग्रामीण भाग, गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी समान वापरता येईल, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागासाठी अर्थसंकल्पात अधिक तरतूद असेल, अशी त्यांनी आशा व्यक्त केली. यापूर्वी भाजपने अर्थसंकल्पात गाव, गरीब, शेतकरी यांच्यावर लक्ष केंद्रित करावे, असे सीतारामन यांना सूचविले होते.