नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. हे पॅकेज मोठा गुणाकारात्मक परिणाम साधण्याच्या उदिष्टाने जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने पहिल्या टाळेबंदीत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून थेट रक्क हस्तांतरित करणार असल्याचे जाहीर केले. याबाबत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, की गरीब कल्याण योजनेमधून मोठा गुणाकारात्मक परिणाम होईल, असे आम्हाला वाटते. हे बँका आणि उद्योगांमधून होणे आवश्यक आहे. आर्थिक पॅकेजचा मोठा परिणाम साधण्यासाठी बँकांमधून खेळत्या भांडवलासाठी निधी देण्याची गरज असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. व्यवसाय सुरू होण्यासाठी प्रोत्साहनात्मक पॅकेज देणे महत्त्वाचे होते.