नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकी मंदीमधून जात आहे. कंपनीने गुरुग्राम आणि मनेसर प्रकल्पामधील उत्पादन दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मारुतीकडून ७ आणि ९ सप्टेंबरला उत्पादन प्रकल्पातील काम बंद ठेवण्यात येणार आहे. या दिवशी कोणतेही उत्पादन घेतले जाणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. सलग सात महिने कंपनीने उत्पादन घटविले आहे. मारुतीने ऑगस्टमध्ये ३३.९९ टक्के उत्पादन घटविले आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये १ लाख ११ हजार ३७० वाहनांचे उत्पादन घेतले.
हेही वाचा-डॉलरपुढे रुपयाची घसरगुंडी; गेल्या ९ महिन्यातील गाठला तळ