हैदराबाद- दिवाळीमध्ये महागाईमुळे सामान्यांना मोठी आर्थिक झळ बसत आहे. आजपासून (1 नोव्हेंबर) काही नियम बदलले आहेत. त्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. आजपासून बँकांमध्ये पैसे जमा करणे व काढण्यासाठी ग्राहकांना शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच गॅस सिलिंडर बुकिंगचे नियमही बदलणार आहेत. तर काही रेल्वेच्या वेळाही बदलणार आहे. या सर्व नियमांचा सामान्यांच्या बजेटवर परिणाम होणार आहे.
दर महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीच्या आढावा घेण्यात येतो. त्याप्रमाणे 1 तारखेला एलपीजी कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचे दर बदलण्यात येतात. गेल्या महिन्यात पेट्रोल व डिझेलचे दर प्रति लिटर 8 रुपयांनी वाढले होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतरही एलपीजीचे दर वाढतात. त्यामुळे गॅस सिलिंडरचे दरही वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-Paytm आणणार 16,600 कोटींचा IPO, गुंतवणूकदारांसाठी यंदाच्या दिवाळीमध्ये मोठी संधी
गॅस सिलिंडरच्या बुकिंगसाठी नवीन नियम-
गॅस सिलिंडर बुक करणे व डिलिव्हरी करण्याची पद्धत बदलणार आहे. नव्या नियमानुसार ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी पाठविण्यात येणार आहे. ओटीपीशिवाय ग्राहकांना गॅस सिलिंडर देण्यात येणार नाही. घरात गॅस सिलिंडर पोहोचल्यानंतर डिलिव्हरी बॉयला ओटीपी सांगितल्यानंतरच ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरसाठी चुकीची मोबाईल क्रमांक देणाऱ्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. गॅस सिलिंडर कंपन्यांनी सर्व ग्राहकांना नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा-महागाईचे संकट: एलपीजीसह पेट्रोल-डिझेलचे दर पुढील आठवड्यात वाढण्याची शक्यता