महाराष्ट्र

maharashtra

मागणी वाढविण्याकरता अर्थसंकल्पातून मदत व्हावी; पीएचडी चेंबर

By

Published : Jan 31, 2021, 1:02 PM IST

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय अग्रवाल म्हणाले की, अर्थसंकल्पातून विकासाला मोठी चालना मिळावी, अशी अपेक्षा आहे. अर्थव्यवस्थेमधील मागणीला चालना मिळावी आणि उपभोगत्यांसह उद्योगांना कमी व्याजदरात मिळावे यासाठी अर्थसंकल्पात प्रयत्न व्हावेत.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२१
केंद्रीय अर्थसंकल्प २०२१

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होताना विविध उद्योगांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत. मागणी वाढविण्यासाठी अर्थसंकल्पातून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा उद्योगांची संस्था पीएच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने व्यक्त केली आहे.

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय अग्रवाल म्हणाले की, अर्थसंकल्पातून विकासाला मोठी चालना मिळावी, अशी अपेक्षा आहे. अर्थव्यवस्थेमधील मागणीला चालना मिळावी आणि उपभोगत्यांसह उद्योगांना कमी व्याजदरात मिळावे यासाठी अर्थसंकल्पात प्रयत्न व्हावेत.

हेही वाचा-अर्थसंकल्पाच्या अंदाजाहून वित्तीय तुटीत १४५.८ टक्क्यांची वाढ

एमएसएमईसाठी नियम कमी व्हावेत व उद्योगानुकूलता वाढविण्यासाठी मदत व्हावी, असेही अग्रवाल यांनी सांगितले. प्राप्तिकराचे प्रमाण कमी व्हावे, अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२०-२१ हा लोकसभेत २९ जानेवारीला सादर करण्यात आला आहे. या अहवालात उत्पादनांवर आधारित सवलत, उद्योगानुकूलतेसाठी सुधारणा व कमी व्याजदराने कर्ज आदी शिफारसी करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-जाणून घ्या, अर्थसंकल्पात वापरण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या संज्ञा

कोरोनाच्या काळातही देशातील गुंतवणुकीत वाढ-

कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्थेला फटका बसला असला तरी थेट विदेशी गुंतवणूक वाढली आहे. ही गुंतवणूक मागील वर्षात १३ टक्क्यांनी वाढून ५७ अब्ज डॉलर झाली आहे.देशातील गुंतवणुकीबाबत युएनसीटीएडीने अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार डिजीटल अर्थव्यवस्थेत गुंतवणूक वाढल्याने थेट विदेशी गुंतवणूक वाढली आहे. फेसबुकच्या मालकी असलेल्या जाडूने जिओमध्ये १० टक्क्यांची ५.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. कोरोनाच्या काळात जागतिक अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीला सामोरे गेली आहे. अशा काळात गुंतवणुकदारांनी विकसनशील देशांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले आहे. जागतिक एकूण थेट विदेशी गुंतवणुकीत भारत आणि चीनकडून ७२ टक्के गुंतवणूक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details