महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टाळेबंदी ५ :  पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगाला मिळणार शिथिलता? - tourism and hospitality sector issues

पाँडेचरी, केरळ, गोव आदी राज्यांच्या अर्थव्यवस्था या पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगावर अवलंबून आहेत. या क्षेत्राला चारही टाळेबंदीत शिथीलता देण्यात आलेली नाही. हॉटेल, रेस्टॉरंट, समुद्रकिनारे खुली करताना येणाऱ्या शक्यतांवर केंद्र सरकार विचार करत आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : May 30, 2020, 7:19 PM IST

नवी दिल्ली - कोरोनामुळे घोषित केलेल्या टाळेबंदीने देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे. केंद्र सरकारने टाळेबंदी ५साठी राज्यांकडून सूचना मागितल्या आहेत. पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगांसाठी शिथिलता द्यावी, अशी काही राज्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

पाँडिचेरी, केरळ, गोव आदी राज्यांच्या अर्थव्यवस्था या पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगावर अवलंबून आहेत. या क्षेत्राला चारही टाळेबंदीत शिथिलता देण्यात आलेली नाही. हॉटेल, रेस्टॉरंट, समुद्रकिनारे खुली करताना येणाऱ्या शक्यतांवर केंद्र सरकार विचार करत आहे.

हेही वाचा-टोळधाडीचा धसका; डीजीसीएकडून विमान कंपन्यांना मार्गदर्शक सूचना

हॉटेल, रेस्टॉरंट आणि पर्यटन सुरू करण्यासाठी राज्यांनी काही मार्ग सूचविले आहेत. यामध्ये भेट देणाऱ्यांची संख्या आणि शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक अशा सूचनांचा समावेश आहे. कमी क्षमतेच्या ग्राहकांना हॉटेलमध्ये बसण्याची परवानगी देणे, तसेच ग्राहकांचे स्क्रीनिंग, आरोग्य सेतू अ‌ॅप बंधनकारक आदींचा समावेश आहे. हे दोन्ही क्षेत्र चालू केल्यास राज्याांना महसूल मिळविणे शक्य होणार आहे.

हेही वाचा-'20 लाख कोटींचे पॅकेज भारताला आत्मनिर्भर करण्याकरता महत्त्वाचे पाऊल'

केंद्र सरकार टाळेबंदी ५ मध्ये उद्योगांना परवानगी देण्यावर विचार करत आहे. मात्र, त्याबाबत सविस्तर चर्चा झाली नसून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details