कर्करोगाच्या उपचारासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून आण्विक संयत्र (आयोसोटोप) वापरण्यात येतात. त्यासाठी पीपीपी तत्वावर आण्विक क्षेत्रातील सुविधा खासगी कंपन्यांना देण्यात येणार आहेत. नाशवंत अन्नाचे जतन करण्यासाठी किरणोत्सार तंत्रज्ञानाचा वापर करण्याची स्टार्टअपला परवानगी देण्यात येणार आहे.
आठ क्षेत्रातील सुधारणांची घोषणा; संरक्षण क्षेत्रातील एफडीआयला ४४ टक्क्यांवरून ७४ टक्के परवानगी - Union finance minister press conference live news
17:11 May 16
आण्विक क्षेत्रातील सुविधा कर्करोग व नाशवंत अन्न टिकविण्यासाठी - निर्मला सीतारामन
17:04 May 16
खासगी कंपन्यांसाठीही अंतराळ क्षेत्र खुले
खासगी कंपन्याही अंतराळ क्षेत्रात काम करत आहेत. त्यासाठी कंपन्यांना खूप वेळ लागत आहे. सरकारच्या निर्बंधामुळे त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे खासगी कंपन्यांनाही उपग्रह प्रक्षेपण करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. स्टार्टअप कंपन्यांना देशामधील भौगोलिक माहिती दिली जाणार आहे. त्यासाठीही सरकारकडून काळजी घेण्यात येणार आहे.
16:58 May 16
केंद्रशासित प्रदेशातील उर्जा वितरण कंपन्यांचे खासगीकरण
- वीजेच्या दराचे धोरण तयार करण्यात येणार
- उर्जा निर्मिती (जेनको) करणाऱ्या उर्जा कंपन्यांवर पैसे मिळणे ही समस्या आहे.
- वीजेसाठी प्रिपेड मीटर बसविण्यात येणार
16:51 May 16
नागरी विमान वाहतुकीसाठी हवाई क्षेत्र अधिक खुले होणार
देशातील केवळ ६० टक्के हवाई क्षेत्र नागरी विमान वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. विमान वाहतुकीसाठी इंधनाचा खर्च जास्त होतो. त्यामुळे देशातील अवकाश क्षेत्राचा कार्यक्षमतेने वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळ व पैशांची बचत होणार आहे. देशातील सहा विमानतळे सार्वजनिक व खासगी (पीपीपी) भागीदारीतून उपलब्ध होणार आहेत. देशातील विमानतळावर अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण खर्च करणार आहे.
16:37 May 16
संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया
युद्धसाहित्य जे आयात करण्यात येणार नाही, त्याची यादी करण्यात येणार आहे. या यादीत दरवर्षी वाढ करण्यात येणार आहे. गुणवत्तेला पात्र ठरलेल्या स्वदेशी युद्धसाहित्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे आयातीचा खर्च कमी होणार आहे. युद्धसाहित्यांचे स्वदेशी सुट्टे भाग खरेदी करण्यात येणार आहे. दारुगोळा व युद्धसाहित्य तयार कारखान्यांचे कॉर्पोटायझेशन करण्यात येणार आहे. त्यांचे खासगीकरण करण्यात येणार नसल्याचे सीतारामन यांनी सांगितले. संरक्षण क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के करण्यात आली आहे.
16:31 May 16
खाणकाम- ५०० खाणी लिलावासाठी पारदर्शकतेने खुल्या करणार आहेत.
16:25 May 16
खालील आठ क्षेत्रात सुधारणा
खालील आठ क्षेत्रात सुधारणा
- कोळसा - कोळसा क्षेत्रात खासगीकरण करण्यात येणार आहे. देशातील कोळसा साठा जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही आयात करावी लागते. कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे दगडी कोळशीची कमतरता भासते. त्यासाठी उद्योगांसाठी नियम करण्यात येणार आहेत. दगडी कोळसा हा पर्यावरणाला अनुकूल नाही. त्यामुळे त्याचे गॅसमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. या क्षेत्राताली ५० हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
- संरक्षण उत्पादन
- एअरस्पेस व्यवस्थापन
- विमानतळ
- प्रादेशक विभागात उर्जा वितरण कंपन्या
- अंतराळ
- आण्विक उर्जा
- खाणकाम-
16:19 May 16
गुंतवणुकीसाठी उपाययोजना
- फास्टट्रॅकने गुंतवणुकीचे प्रस्तावांना मंजुरी
- गुंतवणुकीसाठी विशेष कक्ष
- औद्योगिक पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण
- जमिनीची सुविधा उपलब्ध करून देणे
16:16 May 16
आठ क्षेत्रात सुधारणा करण्याचा उद्देश आहे.
16:15 May 16
बँकिंग क्षेत्रात सुधारणा करायच्या आहेत.
16:09 May 16
आपल्याला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रातील कठीण परिस्थिती बनली आहे. आज संरचनात्मक बदलण्यावर आर्थिक पॅकेजमध्ये लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
16:07 May 16
आत्मनिर्भर पॅकेजद्वारे भारताला सक्षम करायचे आहे.
आत्मनिर्भर पॅकेजद्वारे भारताला सक्षम करायचे आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करण्यात येत असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
15:59 May 16
नवी दिल्ली - कोरोना महामारी आणि टाळेबंदी अशा दुहेरी संकटात अर्थव्यवस्था सापडली आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आठ क्षेत्रात महत्त्वाच्या आर्थिक सुधारणा जाहीर केल्या आहेत. यामध्ये संरक्षण क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के करणे, अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले करणे, कोळसा क्षेत्रात खासगी कंपन्यांना परवानगी आदी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
निर्मला सीतारामन या चौथ्या टप्प्यातील अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला दिलासा देणारे पॅकेज जाहीर करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सीतारामन यांची ही सलग चौथी पत्रकार परिषद आहे. सीतारामन यांनी शुक्रवारी तिसऱ्या टप्प्यातील कृषी केंद्रीत आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये कृषी उद्योगाला तत्काळ १ लाख कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.