मुंबई - लोकांना उत्कृष्ट होण्याकरिता नेतृत्वाने प्रेरित करावे, त्यांना खचवू नये, असे मत टाटाचे वरिष्ठ अधिकारी वनमाली अग्रवाल यांनी व्यक्त केले. ते जागतिक हिंदू आर्थिक मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते.
वनमाली अग्रवाल हे टाटा ग्रुपमधील पायाभूत, संरक्षण आणि अंतराळविश्वचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले, उद्योगामधून पुरेसा नफा मिळवून तो नवसंशोधन आणि प्रगतीसाठी गुंतवणुकीसाठी वापरायला हवा. हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच लोकांना सोबत घेणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा-एमएसएमईची बहुतांश थकित रक्कम अदा - निर्मला सीतारामन
संस्थेमधील सर्व पातळीवरील लोकांनी एकनिष्ठ आणि बांधिलकीने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. नेतृत्व म्हणजे जगभरातून केवळ स्वप्ने घेणारी ड्रीम टीम नाही, तर अस्तित्वात असलेल्या मनुष्यबळातून उत्कृष्ट असे मनुष्यबळ घेणे आहे. पुढे ते म्हणाले, भारत जगामध्ये नवसंशोधनासाठी मोठे केंद्र ठरू शकते. तसेच तळातील समस्या सोडविण्यासाठी कमी खर्चातील उपाय भारत विकसित करू शकतो.