महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनाचा अर्थजगतावर परिणाम : जाणून घ्या, काही महत्त्वाच्या घडामोडी

कोरोनाचे सावट असल्याने विवध उद्योग व व्यवसायांवर परिणाम झाला आहे. अशा संकटात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये, अशी सूचना सीआयआयचे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी केली.

By

Published : Mar 19, 2020, 7:25 PM IST

Share Market
शेअर बाजार

नवी दिल्ली - कोरोनाने देशाचे अर्थकारणही ढवळून निघाले आहे. कोरोनाचा विविध उद्योगांवर परिणाम होत आहे. तर आरबीआयने कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याच्या सूचना केल्या आहेत.

  • पेट्रोल-डिझेलच्या मागणीत घट

नवी दिल्ली - पेट्रोलच्या मागणीत मार्चच्या पहिल्या आठवड्यात १० ते ११ टक्के घसरण झाली आहे. कोरोनाचा प्रसार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विमान उड्डाणे आणि औद्योगिक चलनवलन थंडावले आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची मागणी कमी झाली आहे.

  • कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नका, सीआयआयची कंपन्यांना सूचना

नवी दिल्ली - कोरोनाचे सावट असल्याने विवध उद्योग व व्यवसायांवर परिणाम झाला आहे. अशा संकटात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये, अशी सूचना सीआयआयचे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी केली.

  • मुकेश अंबानी व कुटुंबीयांचा रिलायन्समध्ये वाढला हिस्सा

नवी दिल्ली - अब्जाधीश मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी आणि तीन मुलांचा रिलायन्समधील शेअरचा हिस्सा वाढला आहे. गेली काही दिवस रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण सुरू आहे.

  • कोरोनाच्या भीतीने रुपयाची डॉलरच्या तुलनेत ८४ पैशांनी घसरण

मुंबई- रुपयाची डॉलरच्या तुलनेत ८४ पैशांनी घसरण झाली आहे. एका डॉलरसाठी रुपयाचे मूल्य हे ७५.१० रुपये झाले आहे. कोरोनाने आर्थिक मंदी येईल, अशी आर्थिक भीती येण्याची गुंतवणूकदारांना भीती आहे.

  • सोन्याच्या दरात किचिंत वाढ; चांदीच्या दरात १९० रुपयांची घसरण

नवी दिल्ली - सोन्याचा दर प्रति तोळा ३१ रुपयांनी वाढून ४०,७१८ रुपये झाला आहे. बुधवारी सोन्याचा दर प्रति तोळा ४०,६८७ रुपये होता. चांदीचा दर प्रति किलोला १९० रुपयांनी घसरून ३५,४४४ रुपये झाला आहे.

हेही वाचा-कोरोनाचा फटका... तब्बल ३.८ कोटी भारतीयांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता

  • आरबीआयची कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सूचना

मुंबई- कोरोना विषाणुचा प्रसार वाढविल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. आरबीआयच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याची सूचना प्रशासनाने केली आहे.

हेही वाचा-कोरोनाने जगभरातील २.५ कोटी लोकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार

ABOUT THE AUTHOR

...view details