नवी दिल्ली - शहरी भागातील भारतीयांना सर्वात अधिक कोणती चिंता वाटते, पीएमसीने जप्त केलेल्या मालमत्तेचे काय होणार यासारख्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा जाणून घ्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सरकारी बँकांच्या प्रमुखांच्या भेटी घेणार आहेत. अशा विविध व्यापार बातम्यांचा आजच्या आढाव्यात समावेश आहे.
- शहरी नागरिकांना बेरोजगारीची सर्वाधिक चिंता
नवी दिल्ली - शहरी भागात राहणाऱ्या भारतीयांना सर्वाधिक म्हणजे बेरोजगारीची चिंता वाटते. तर देशातील ६९ टक्के लोकांना देश योग्य दिशेने जात असल्याचे वाटते. ही माहिती सर्व्हेतून समोर आली आहे. वित्तीय आणि राजकीय भ्रष्टाचार, गुन्हे आणि हिंसा, गरीबी आणि सामाजिक विषमता आणि हवामान बदल याबाबतही भारतीयांना चिंता वाटत असल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे. हा सर्व्हे इप्सॉस या संशोधन संस्थेने केला.
- पामतेलावरील आयात शुल्कात कपात करू नये, एसईएची सरकारला विनंती
नवी दिल्ली - सरकारने पामतेलावरील आयात शुल्कात कपात करू नये, अशी विनंती खाद्यतेल उद्योगाची संस्था असलेल्या एसईएने केली आहे. आयात शुल्क ४० टक्क्यांवरून ३० टक्के केल्यास देशातील तेलउत्पादकांवर परिणाम होईल, अशी संघटनेने भीती व्यक्त केली आहे.
- आयात करूनही कांद्याच्या किमती आटोक्याबाहेर
नवी दिल्ली- किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रति किलो १५० रुपये आहेत. कांद्याची आयात करूनही किमती उतरलेल्या नाहीत. मुंबईत कांदा प्रति किलो ८० रुपयाने दर दिल्लीत १०२ रुपयाने विकण्यात आला आहे.
- केंद्रीय अर्थमंत्री सरकारी बँक प्रमुखांची भेट घेणार
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सरकारी बँकांच्या प्रमुखांच्या भेटी घेणार आहेत. या भेटीदरम्यान नुकताच जाहीर केलेल्या सुधारणा आणि अर्थव्यवस्थेमधील समस्यांवर चर्चा होणार आहे.
हेही वाचा-रेल्वे प्रवासाच्या तिकिटांचे दर वाढणार; व्ही. व्ही. यादव यांचे संकेत
- जप्त केलेल्या मालमत्तेचे पीएमसी प्रशासक करणार मूल्यांकन