तिरुवनंतपुरम- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही व्यवसायावर निर्बंध राहिल्याने केरळमधील व्यापाऱ्यांचा संयम तुटत आहे. व्यवसायी एकोपना समिती या केरळमधील व्यापाऱ्यांच्या संघटनेने 9 ऑगस्टला दुकाने उघडणार असल्याचे जाहीर केले आहे.
व्यवसायी एकोपना समितीतचे अध्यक्ष टी. नसरुद्दीन म्हणाले, की राज्य सरकारला सर्व महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी भरपूर वेळ दिला आहे. तरीही काहीही बदल झाला नाही. केरळ सरकारने जाहीर केलेल्या कोव्हिड पॅकेज म्हणजे काहीच नाही. आम्ही 9 ऑगस्टला दुकाने उघडणार आहोत.
हेही वाचा-कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यातच; तर ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांक गाठणार
जुलै महिन्यात कोझीकोडे येथे विविध व्यापाऱ्यांनी आंदोलने केली आहेत. आम्हालाही जगायचे आहे, अशा त्यांनी घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पोलिसाबरोबर वाद झाला होता. आमचे कोण कर्ज कोण फेडणार आहे. (लॉकडाऊन) अनिश्चितकाळासाठी असू शकत नाही. केरळमधील व्यापारी संघटनेनेही व्यापाऱ्यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दर्शविला आहे.