महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पर्यटन उद्योगाला चालना देण्याकरता केरळकडून 455 कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर - Surendran Kadakampally on tourism sector

पर्यटन मंत्र्यांनी केरळच्या पर्यटन उद्योगासाठी 455 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. पॅकेजमधील दोन योजनांमधून पर्यटन उद्योगाला चालना देण्याचा केरळ सरकारचा प्रयत्न आहे. पर्यटन उद्योगातील आंत्रेप्रेन्युअरला सवलतीच्या व्याजदरात कर्ज देण्यात येणार आहे.

केरळचे पर्यटन मंत्री
केरळचे पर्यटन मंत्री

By

Published : Aug 20, 2020, 3:13 PM IST

तिरुवनंतपुरम - पर्यटन उद्योगाला आर्थिक दिलासा देण्यासाठी केरळ सरकारने 455 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जााहीर केले आहे. कोरोना महामारीमुळे पर्यटन उद्योगाचे 2 हजार 500 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज केरळचे पर्यटन मंत्री कडकअम्पल्ली सुरेंद्रन यांनी व्यक्त केला. ते माध्यमांशी बोलत होते.

केरळचे पर्यटन मंत्री कडकअम्पल्ली सुरेंद्रन म्हणाले, की राज्यातील विमान आणि रेल्वे सेवा पुर्णपणे ठप्प आहे. तर पर्यटन क्षेत्रात आजवरची सर्वात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असलेल्या अनेकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम झाला आहे.

पर्यटन मंत्र्यांनी केरळच्या पर्यटन उद्योगासाठी 455 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. पॅकेजमधील दोन योजनांमधून पर्यटन उद्योगाला चालना देण्याचा केरळ सरकारचा प्रयत्न आहे. पर्यटन उद्योगातील लघुउद्योजकांना सवलतीच्या व्याजदरात कर्ज देण्यात येणार आहे.

असे मिळणार पर्यटन उद्योगाला पॅकेज..

  • केरळचे पर्यटनमंत्री सुरेंद्रन यांनी पॅकेजची माहिती दिली. ते म्हणाले, की राज्य पातळीवरील बँकरची समिती (एसएलबीसी) ही 25 लाखापर्यंतचे कर्ज लघुउद्योजकांना देणार आहे.
  • या योजनेसाठी राज्याच्या पर्यटन विभागाकडून व्याजदरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
  • पर्यटन उद्योगातील कामगारांना 20 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज केरळ बँकेकडून देण्यात येणार आहे. हे कर्ज 9 टक्क्यांनी देण्यात येणार आहे. मात्र, लाभार्थ्यांना कर्जावर केवळ 3 टक्के व्याज द्यावे लागणार आहे. उर्वरित कर्जाचे 6 टक्के व्याज पर्यटन विभाग देणार आहे.
  • राज्यातील लहान 2 हजार 500 लघुउद्योजकांना 1 लाख ते 3 लाखांपर्यतचे कर्ज देण्यात येणार आहे.
  • मोठ्या 2,500 आंत्रेप्रेन्युअरला 5 लाख ते 25 लाखांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे.
  • सुरुवातीच्या सहा महिन्यांपर्यत योजनेतील कर्जदारांना हप्ता भरावा लागणार नाही.

दरम्यान, गतवर्षी केरळ पर्यटन उद्योगाला एकूण 45 हजार कोटींचे उत्पन्न मिळाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details