नवी दिल्ली- जीएसटी मोबदला मिळण्यावरून केंद्र सरकार व राज्यांमध्ये असलेला तिढा अखेर सुटला आहे. केंद्र सरकारने कर्ज घेण्याचा दिलेला पर्याय झारखंडने स्विकारला आहे. यापूर्वीच २७ राज्यांसह तीन केंद्रशासित प्रदेशांनी कर्जाचा पर्याय स्विकारला आहे.
झारखंड राज्याला विशेष खिडकी योजनेतून १,६८९ कोटी रुपयांचे कर्ज केंद्र सरकारकडून मिळणार आहे. केंद्र सरकारने झारखंडला राज्याच्या जीडीपीच्या तुलनेत अतिरिक्त ०.५ टक्के म्हणजे १,७६५ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे. मागील काही आठवड्यात ओडीशा, पश्चिम बंगाल, केरळ आणि पंजाबने केंद्र सरकारकडून कर्जाचे पर्याय स्वीकारले आहे. या राज्यांनी कर्ज घेण्याचा पर्याय नाकारत केंद्र सरकारकडून जीएसटी मोबदला मिळावी, अशी मागणी केली होती.
हेही वाचा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; 100 टक्के जीएसटी परतावा देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी