नवी दिल्ली - मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यावेळी त्यांनी सर्वांना पिण्याचे स्वच्छ व पुरेसे पाणी देण्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या जलशक्ती मंत्रालयांर्गंत हर घर जल ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
UNION BUDGET : 'जलशक्ती' या नवीन मंत्रालयांतर्गत 'हर घर जल' योजना आणणार - अर्थमंत्री - BUDGET
सर्वांना पिण्याचे स्वच्छ व पुरेसे पाणी देण्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या जलशक्ती मंत्रालयांर्गंत हर घर जल ही योजना सुरू करण्यात येणार
सीतारामन म्हणाल्या, आमच्या सरकारने पाण्यासाठी जल शक्ती मंत्रालय सुरू केले आहे. यामाध्यमातून सर्वांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टम, भूजल पुनर्भरणासाठी प्रयत्न केले जातील. तसेच देशातील एकूण १५०० विभागाची (BLOCK) निवड करण्यात आली आहे. त्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येणार आहे.
या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी पोहोचवले जाणार आहे. यासाठी आमच्या सरकारने २०२४ पर्यंतचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. जलशक्ती मंत्रालयाचे गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे पदभार आहे.