नवी दिल्ली - प्राप्तीकर विवरण पत्र भरण्याची मुदत ३० जुलैवरून एका महिन्याने वाढविली आहे. त्यामुळे प्राप्तिकर भरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र प्राप्तीकर भरणाऱ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत विवरण पत्र भरणे टाळल्यास त्यांना दंड भरावा लागणार आहे.
प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची ३१ ऑगस्ट अंतिम मुदत , उशीर झाल्यास एवढा भरावा लागणार दंड - प्राप्तिकर विभाग
प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार सर्व करदात्यांना ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत प्राप्तीकर विवरण भरणे आवश्यक आहे. अन्यथा करदात्याला दंड भरावा लागणार आहे.
प्राप्तिकर विवरण पत्र
प्राप्तिकर विभागाकडे आयटी रिटर्न भरणे वेळेत बंधनकारक असते. अन्यथा करदात्याला दंड भरावा लागतो.
दंड वाचविण्यासाठी वेळेवर भरा प्राप्तिकर विवरणपत्र-
प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार सर्व करदात्यांना ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत प्राप्तीकर विवरण भरणे आवश्यक आहे. अन्यथा करदात्याला दंड भरावा लागणार आहे.
- प्राप्तिकर विवरण पत्र ३१ ऑगस्ट २०१९ नंतर ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत भरल्यास ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
- ३१ डिसेंबर २०१९ नंतर प्राप्तिकर विवरण भरणाऱ्यांना १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
- जर ३१ मार्च २०२० नंतर प्राप्तिकर विवरण भरले नाही तर प्राप्तिकर विभागाकडून नोटीस पाठविली जाणार आहे.
- ज्यांचे उत्पन्न हे ५ लाख रुपयांहून कमी आहे, त्यांना उशीर झाल्याने केवळ १ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.