महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'स्वतंत्र संशोधन आणि विकास लॅब सुरू करण्याकरता अर्थसंकल्पात तरतूद करा' - केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ अपेक्षा न्यूज

ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे (टीपीसीआय) संस्थापक तथा चेअरमन मोहित सिंगला म्हणाले की, व्यापारामध्ये मोठी आव्हाने निर्माण होत आहेत. त्यामुळे भारतीय लॅबमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थसंकल्प

By

Published : Jan 23, 2021, 9:51 PM IST

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत विविध उद्योगांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत. जागतिक दर्जाच्या संशोधन आणि विकासच्या लॅब स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी टीपीसीआयने केली आहे.

ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे (टीपीसीआय) संस्थापक तथा चेअरमन मोहित सिंगला म्हणाले की, व्यापारामध्ये मोठी आव्हाने निर्माण होत आहेत. त्यामुळे भारतीय लॅबमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे.

हेही वाचा-अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी अधिक तरतूद करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

काय आहे टीपीसीआयची मागणी?

  • लॅबसाठी स्वतंत्र संशोधन आणि विकास लॅब करण्यात याव्यात. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
  • भारतीय उत्पादनेही परवडणाऱ्या दरात नाहीत. त्यामुळे भारतीय उत्पादनांना कमी व्याजदराने कर्ज द्यावे. भारतीय उत्पादने जगभरात जावीत, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
  • अन्नाच्या विक्रीसाठी इनपूट टॅक्स क्रेडिटवर सवलत द्यावी, अशी मागणी टीपीसीआयने केली आहे.
  • पायाभूत क्षेत्र, डिजीटल पायाभूत क्षेत्र यासाठी टॅक्स हॉलिडेवर पाच वर्षांसाठी सवलत द्यावी. तसेच अन्न प्रक्रिया उद्योगाला कमी कर, तंत्रज्ञानाची उपलब्धता यासाठी खास सवसत द्यावी, अशीही त्यांनी मागणी केली.

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला सादर करणार आहेत.

हेही वाचा-टिकटॉकसह चिनी अ‌ॅपवरील बंदी कायम राहणार

ABOUT THE AUTHOR

...view details