नवी दिल्ली - महागाई ही नियंत्रणात असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले. त्या आर्थिक तिसऱ्या सुधारणांच्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. कारखान्यातील उत्पादनात सुधारणा झाल्याची चिन्हे स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती सांगताना निर्मला सितारामन यांनी महागाई ही चार टक्क्यांहून खूप कमी असल्याचे सांगितले. चालू आर्थिक वर्षात जुलैमध्ये औद्योगिक उत्पादनात सुधारणा झाल्याची चिन्हे स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-नियामक संस्थेच्या अनिश्चततेने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरला - आयएमएफ
यापूर्वी सरकारने बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) वित्त पुरवठा होण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामध्ये अंशत: कर्ज पुरवठा हमी योजनेचा समावेश आहे. त्याचा अनेक बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना फायदा झाल्याचे त्यांनी अर्थमंत्र्यांनी सांगितले.