महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

औद्योगिक उत्पादनाच्या वृद्धीदरात ऑगस्टमध्ये १.१ टक्क्यांची घसरण; गेल्या सात वर्षातील नोंदविला निचांक - Marathi Business News

गतवर्षी ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) हा ४.८ टक्के होता. उत्पादन क्षेत्राचा औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ७७ टक्के वाटा असतो. उत्पादन क्षेत्रातही घसरण होवून १.२ टक्क्यांची नोंद झाली आहे.

संग्रहित - औद्योगिक उत्पादन

By

Published : Oct 11, 2019, 7:30 PM IST

Updated : Oct 11, 2019, 7:46 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने विविध आर्थिक सुधारणांच्या उपाययोजना करूनही मंदीचे सावट कायम आहे. औद्योगिक उत्पादनाच्या वृद्धीदरात ऑगस्टमध्ये १.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या सात वर्षातील निचांकी औद्योगिक उत्पादन झाले आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा (आयआयपी) ४.८ टक्के वृद्धिदर होता.

उत्पादन क्षेत्र, वीजनिर्मिती व खाण उद्योगाच्या निराशाजनक कामगिरीने औद्योगिक उत्पादनात घसरण झाली आहे. तर चालू वर्षात जूलैमध्ये औद्योगिक उत्पादनाचा वृद्धीदर हा ४.३ टक्के होता.

हेही वाचा-अर्थव्यवस्थेला झटका : औद्योगिक उत्पादनात ऑगस्टमध्ये घसरण होवून १.१ टक्क्यांची नोंद

  • उत्पादन क्षेत्राचा औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ७७ टक्के वाटा असतो. उत्पादन क्षेत्रातही १.२ टक्क्यांची घसरण झाली आहे.
  • गतवर्षी उत्पादन क्षेत्राने ५.२ टक्के वृद्धीदर नोंदविला होता.
  • विद्युत निर्मितीत ०.९ टक्क्यांची घसरण झाली आहे. गतवर्षी विद्युत निर्मितीचा वृद्धीदर हा ७.६ टक्के होता.
  • उद्योग क्षेत्राचा वृद्धीदर हा तेवढाच म्हणजे ०.१ टक्केच राहिला आहे.

हेही वाचा-देशातील दोन सहकारी संस्थांचा दूध पुरवठ्याकरिता श्रीलंकेबरोबर सामंजस्य करार

  • चालू वर्षात एप्रिल ते ऑगस्टदरम्यान एकूण औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा वृद्धीदर हा २.४ टक्के होता. तर गतवर्षी एकूण औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा ५.३ टक्के होता.
  • कारखान्यांमधील उत्पादन हे गेल्या ८१ वर्षातील सर्वात कमी राहिले आहे.


काय आहे औद्योगिक उत्पादन निर्देशांक -
देशातील अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिक वृद्धीदर किती आहे, याची माहिती औद्योगिक उत्पादन निर्देशांकामधून समजू शकते. हे आकडेवारी काढण्यासाठी वेगवेगळ्या १५ संस्थांकडून आकडेवारी गोळा केली जाते.

Last Updated : Oct 11, 2019, 7:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details