नवी दिल्ली - केंद्र सरकारने विविध आर्थिक सुधारणा करूनही देशाच्या अर्थव्यवस्थेवरील मंदीचे सावट अजूनही कायम आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकांत ऑक्टोबरमध्ये ३.८ टक्क्यांची घसरण झाली आहे. उर्जा, खाणकाम, उत्पादन क्षेत्रातील खालावलेल्या कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादनात घसरण झाली आहे. चालू वर्षात सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनात ४.३ टक्के घसरण झाली आहे.
कारखान्यातील उत्पादन हे औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) मोजले जाते. गतवर्षी औद्योगिक उत्पादनाचा ८.४ टक्के वृद्धीदर राहिला होता. उत्पादन क्षेत्रात ऑक्टोबरमध्ये २.१ टक्के घसरण झाली आहे. तर गतवर्षी उत्पादन क्षेत्राचा ८.२ टक्के वृद्धीदर होता. उर्जा निर्मिती क्षेत्रात ऑक्टोबरमध्ये १२.२ टक्के घसरण झाली आहे. तर गतवर्षी उर्जानिर्मितीचा १०.८ टक्के वृद्धीदर होता. खाण उत्पादनात ८ टक्के घसरण झाली. तर गतवर्षी खाण उत्पादनात ७.३ टक्के एवढा वृद्धीदर राहिला होता.
हेही वाचा-मंदीचे ग्रहण सुटेना! औद्योगिक उत्पादनाच्या दरात ४.३ टक्के घसरण