मुंबई -अर्थव्यवस्थेच्या विकासदराबाबत महत्त्वाची बातमी आहे. देशाच्या जीडीपीत डिसेंबरच्या तिमाहीत १ टक्के घसरण होईल, असा अंदाज वॉल स्ट्रीट ब्रोकेज बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने केला आहे.
देशातील बहुतेक पतमानांकन संस्थांनी देशाच्या विकासदरात ०.४ ते ०.७ टक्के वाढ होईल, असा अंदाज केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासदरात २३.९ टक्के घसरण झाली होती. तर दुसऱ्या तिमाहीत ७.५ टक्के घसरण झाली होती. चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत विकासदरात १५.७ टक्के घसरण झाली आहे.
बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज इंडियाच्या (बीओएफए) अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात ७ ते ७.७ टक्के विकासदरात घसरण होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यानंतर विकासदरातील सर्वात मोठी घसरण दुसऱ्या व तिमाहीत झाली आहे.