मुंबई - देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर चालू आर्थिक वर्षात ५ टक्क्यांनी घसरणार असल्याची शक्यता आहे. मात्र, पुढील आर्थिक वर्षात विकासदर पुन्हा ५ टक्क्यांनी वधारेल, असे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर दुव्वुरी सुब्बाराव यांनी व्यक्त केले. ते भारतीय अर्थव्यस्था या विषयावरी वेबिनावरमध्ये बोलत होते. याचे आयोजन एसपीजेआयएमआर बिझनेस स्कूलने केले होते.
आरबीआयचे माजी गव्हर्नर सुब्बाराव म्हणाले, की पुढील आर्थिक वर्षात विकासदर ५ टक्के वाढणार आहे. हे योग्य प्रमाण असल्याचा माझा विश्वास आहे. कारण कोरोनाचे संकट हे नैसर्गिक आपत्ती नाही. आपले कारखाने अजून जागेवर आहेत. पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्था स्थिर आहे. विकासदर घसरल्याने श्रीमंत देशांनाही जुळवाजुळव करणे कठीण जाणार असल्याचे सुब्बाराव यांनी सांगितले.
हेही वाचा-'राज्यांनी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज देण्यासाठी पुढे यावे'