नवी दिल्ली- किरकोळ बाजारातील महागाई एप्रिलमध्ये वाढल्याची आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने प्रसिद्ध केली. याच महिन्यात घाऊक बाजारातील महागाईत घट होवून ती ३.०७ टक्के झाली आहे. तेलइंधनासह उत्पादनांच्या कमी झालेल्या किंमतीमुळे हा परिणाम झाल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे.
घाऊक बाजारातील महागाईत एप्रिलमध्ये घट, ३.०७ टक्क्यांची नोंद - Wholesale Price Index
एप्रिल २०१९ मध्ये घाऊक बाजारातील महागाईचा दर ३.१८ टक्क्याने वाढला. गतवर्षी एप्रिलमध्ये घाऊक बाजारातील महागाईचा दर हा ३.६२ टक्के होता.
घाऊक बाजार
वार्षिक महागाईचा दर हा घाऊक बाजारातील महागाईच्या निर्देशांकावर आधारित आहे. एप्रिल २०१९ मध्ये घाऊक बाजारातील महागाईचा दर ३.१८ टक्क्याने वाढला. गतवर्षी एप्रिलमध्ये घाऊक बाजारातील महागाईचा दर हा ३.६२ टक्के होता. ही आकडेवारी केंद्रीय माहिती आणि उद्योग मंत्रालयाने दिली आहे. चालू आर्थिक वर्षात महागाईचा दर हा ०.७५ टक्क्याने वाढला आहे. गतवर्षी याच कालावधीत ०.८६ टक्के महागाईचा दर होता.