नवी दिल्ली - भारतीय बँकिंग व्यवस्था सदृढ आणि स्थिर आहे. एका घटनेचा संपूर्ण व्यवस्थेच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकत नाही, असे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले. ते आरबीआयचे तिमाही पतधोरण जाहीर करताना पत्रकार परिषदेत बोलत होते.
पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील (पीएमसी) मोठा घोटाळा उघडकीला आला आहे. त्यामुळे विविध बँकांचे ठेवीदार चिंताग्रस्त झाले आहेत. याबाबत बोलताना शक्तिकांत दास म्हणाले, लोकांनी आणि ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. विनाकारण चिंताग्रस्त होण्याची गरज नाही. अफवांमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण होते.
हेही वाचा-केंद्र सरकारकडून पैशाची मागणी झाल्याची माहिती नाही - आरबीआय गर्व्हनर
दुसऱ्या प्रकरणात भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर तात्पुरती सुधारणात्मक आकृतीबंधाची (प्रॉम्पट करेक्टिव्ह अॅक्शन) कारवाई केली आहे. या बँकेवर वाढलेल्या बुडित कर्जामुळे कारवाई करण्यात आली आहे.