ब्राझिलिया- भारत ही जगातील सर्वात खुली आणि गुंतवणूक स्नेही अर्थव्यवस्था असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते ब्रिक्स व्यापार मंचाच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. उद्योगातील नेतृत्वाने भारतात गुंतवणूक करावी, असे पंतप्रधानांनी यावेळी आवाहन केले. देशामधील अमर्यादित शक्यता आणि अगणित संधीचा लाभ घ्यावा, असेही पंतप्रधान म्हणाले.
जागतिक आर्थिक मंदी असतानाही पाच देशांच्या गटाने (ब्रिक्स) आर्थिक प्रगतीचे नेतृत्व केल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, राजकीय स्थिरता असल्याने भारत ही सर्वात अधिक गुंतवणूक स्नेही अर्थव्यवस्था आहे. आम्ही देशाला २०२४ पर्यंत ५ लाख कोटींची अर्थव्यवस्था करणार आहोत. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी १.५ लाख कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहेत. ब्रिक्स देशांचे जागतिक आर्थिक प्रगतीमध्ये ५० टक्के योगदान आहे. जागतिक मंदी असतानाही ब्रिक्स देशांनी अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. लाखो लोकांना गरिबीमधून बाहेर काढत तंत्रज्ञान आणि नवसंशोधनात नवे यश मिळविले आहे. ब्रिक्सच्या स्थापनेला दहा वर्ष होत असताना ब्रिक्स मंचाने भविष्यातील प्रयत्नावर विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी हा चांगला मंच आहे.
हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांकात ५४.६१ अंशाची घसरण; निराशाजनक आर्थिक आकडेवारीचा परिणाम