संयुक्त राष्ट्रसंघ - भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारी मुद्द्याबाबत लक्षणीय प्रगती होत आहे. येत्या काळात व्यापारी करार करण्यासाठी दोन्ही देश सकारात्मक आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबर अमेरिका व्यापार करार लवकरच करणार असल्याची माहिती दिली. आम्ही छान काम करत आहोत. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लिथिझर हे भारताबरोबर व्यापारी तडजोडी करणार आहेत. मात्र, नेमका केव्हा करार करण्यात येईल हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेनिमित्त भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय चर्चा करण्यात आली. भारताने आयात शुल्क कमी करावे, यासाठी अमेरिकेकडून दबाव आणण्यात येत आहे.
हेही वाचा-ह्युस्टनला येवून उर्जा क्षेत्राबद्दल न बोलणे अशक्य - मोदी