नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्थेमध्ये २०२१ मध्ये जर्मनीनंतरची सर्वात मोठी बळटक अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल, अशा विश्वास पीएचडीसीसीआय इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिझायलन्सने (आयईआर) व्यक्त केला आहे.
अर्थव्यवस्थेच्या मानांकनात पुढील आर्थिक वर्षात जर्मनी प्रथम, भारत द्वितीय तर दक्षिण कोरिया तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे. याबाबतचा अहवाल पीएचडीसीसीआय या संस्थेने जाहीर केली आहे. पीएचडीसीसीआयने पाच निर्देशांकाच्या आधारे अर्थव्यवस्थेची मानांकने तयार केली आहेत. यामध्ये जगातील आघाडीच्या दहा अर्थव्यवस्थांचा समावेश आहे.