नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेची घसरण होत असताना इंडिया रेटिंग्ज आणि रिसर्च या पतमानांकन संस्थेने पुढील आर्थिक वर्षाबाबत अंशत: दिलासादायक अंदाज केला आहे. पुढील आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर ५.५ राहिल, असा या पतमानांकन संस्थेने अंदाज केला आहे.
इंडिया रेटिंग्जने राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अंदाजाहून देशाचा जीडीपी अधिक राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या संकटात सापडल्याने वित्तपुरवठा विस्कळित झाल्याचे इंडिया रेटिंग्जने अहवालात म्हटले आहे. कौटुंबिक उत्पनाच्या वृद्धीदरात घट झाली आहे. तसेच विविध वादावर तोडगा काढण्यासाठी असलेल्या व्यवस्थेचा अभाव यामुळे भांडवल अडकून राहिल्याचे अहवालात म्हटले आहे.