नवी दिल्ली- जगातील ८२ देशांच्या जागतिक सामाजिक गतीशील सूचकांच्या यादीत भारताचा ७६ वा क्रमांक आहे. ही यादी जागतिक आर्थिक मंचाने प्रसिद्ध केली आहे. या यादीत डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर आहे.
जागतिक आर्थिक मंचाची (डब्ल्यूइएफ) ५० वी वार्षिक बैठक होण्यापूर्वी मंचाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात विविध देशांच्या जागतिक सामाजिक गतीशील सूचकांची (ग्लोबल सोशल मोबिलीटी इन्डेक्स) आकडेवारी दिली आहे. आर्थिक समानतेला चालना देण्यासाठी सोशल मोबिलीटी हा महत्त्वाचा घटक आहे. सोशल मोबिलीटीत १० टक्के वाढ झाल्याने सामाजिक दृढसंबध आणि जागतिक अर्थव्यवस्थेला ५ टक्क्यांची चालना मिळेल, असा डब्ल्यूइएफने म्हटले आहे. मात्र, काही देशांच्या अर्थव्यवस्था या सोशल मोबिलिटीला पोषक असल्याच्या योग्य स्थितीत असल्याचे डब्ल्यूइएफने म्हटले आहे.
हेही वाचा-शेअर बाजारात ४१६ अंशाची घसरण; कोटक बँकेच्या शेअरला ५ टक्क्यांचा फटका