वॉशिंग्टन- जगात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी भारताची एक अर्थव्यवस्था असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) संवाद संचालक गॅर्री राईस यांनी व्यक्त केले. गेल्या पाच वर्षात भारतात बऱ्याच सुधारणा झाल्याचे सांगत आणखी सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दर पंधरा दिवसांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये भारताच्या आर्थिक विकासावर बोलताना गॅर्री राईस यांनी मत व्यक्त केले.
जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी भारताची अर्थव्यवस्था - आयआयएमएफ - आयएमएफ
उच्च विकासदर गाठण्यासाठी आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे आम्हाला वाटते. धोरणात्मक बाबतीत बँकांची (कारभाराची) स्वच्छता, राज्य व केंद्र सरकारकडून वित्तीय तुटीवर करण्यासाठी प्रत्यक्ष कृती अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
भारताचा विकासदर हा गेल्या ५ वर्षात सरासरी ७ टक्के राहिल्याचे गॅर्री राईस यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, की देशात महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. उच्च विकासदर गाठण्यासाठी आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे आम्हाला वाटते. धोरणात्मक बाबतीत बँकांची (कारभाराची) स्वच्छता, राज्य व केंद्र सरकारकडून वित्तीय तुटीवर करण्यासाठी प्रत्यक्ष कृती अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. याचबरोबर व्यापक स्तरावर कामगार, जमीन सुधारणा आणि व्यवसायासाठी पोषक वातावरण या बाबी अधिक विकास करण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
पुढील महिन्यात जागतिक बँकेची वार्षिक बैठक आहे. या बैठकीदरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूक (डब्ल्यूईओ) हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल सविस्तर माहिती समोर येणार आहे.