महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'अमेरिका-इराणमधील तणावस्थितीसह कच्च्या तेलाच्या किमतीवर भारताचे लक्ष' - Dharmendra Pradhan on oil prices

भारत हा कच्च्या तेलाची आयात करणारा जगातील आघाडीचा देश आहे. त्यामुळे खनिज तेलाच्या किमतीवर होणाऱ्या परिणामाकडे लक्ष असल्याचेही धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

Dharmendra Pradhan
धर्मेंद्र प्रधान

By

Published : Jan 8, 2020, 5:04 PM IST

नवी दिल्ली- अमेरिका-इराणमधील भू-राजकीय तणावाच्या स्थितीकडे भारत काळजीपूर्वक लक्ष ठेवून असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.

भारत हा कच्च्या तेलाची आयात करणारा जगातील आघाडीचा देश आहे. त्यामुळे खनिज तेलाच्या किमतीवर होणाऱ्या परिणामाकडे लक्ष असल्याचेही धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. कोणत्याही उद्भवणाऱ्या संकटाला सामोरे जाण्याची तयारी करत असल्याची त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा-सलग सहा दिवसांच्या दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीला 'ब्रेक'

गेली काही दिवस खनिज तेलामधील दरवाढ आहे सुरू -

भारत देशांतर्गत लागणाऱ्या खनिज तेलाच्या गरजेसाठी ८० टक्के आयातीवर अवलंबून आहे. मात्र, इराण आणि अमेरिकेमधील तणावाच्या स्थितीनंतर जागतिक बाजारातील खनिज तेलाचे दर वाढले आहेत. नव्या वर्षात सलग सहा दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. येत्या काही दिवसात आणखी पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा-सुझलॉन एनर्जीने बँकांचे थकविले ७,२०० कोटी रुपये!

ABOUT THE AUTHOR

...view details