नवी दिल्ली - जगभरातील देशांची नवसंधोधन करण्याची क्षमता आणि त्यामधील प्रगती करणारा जागतिक नवसंशोधन निर्देशांक (ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स) दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. यामध्ये निर्देशांकात भारताची ५ अंकाने सुधारणा होवून ५७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. हा अहवाल केंद्रीय वाणिज्य आणि औद्योगिक मंत्री पियूष गोयल यांच्याहस्ते आज प्रसिद्ध करण्यात आला.
भारताची जागतिक नवसंशोधन निर्देशांकात ५ अंकाने सुधारणा, पोहोचला ५२ व्या क्रमांकावर
जीआयआयचा अहवाल (ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स) कॉर्नेल विद्यापीठ, इनसीड, संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक बौद्धिक संपदा संस्था (डब्ल्यूआयपीओ) आणि जीआयआय नॉलेज भागीदारांकडून प्रसिद्ध केला जातो.
जीआयआयचा अहवाल (ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स) कॉर्नेल विद्यापीठ, इनसीड, संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक बौद्धिक संपदा संस्था (डब्ल्यूआयपीओ) आणि जीआय नॉलेज भागीदारांकडून प्रसिद्ध केला जातो. जीआयआयच्या मानांकनाची बारावी आवृत्ती आहे. त्यामध्ये १२९ अर्थतज्ज्ञ हे ८० विविध निकषांवर अहवाल सादर करण्यात येतो. त्यामध्ये बौद्धिक संपदेचे अर्ज भरण्याची संख्या ते मोबाईल अॅप्लीकेशनची संख्या, शिक्षणावरील खर्ज आणि वैज्ञानिकसह तंत्रज्ञान प्रकाशन यांचाही समावेश आहे.
स्वित्झर्लंड हे जागतिक नवसंशोधन निर्देशांकात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर स्वीडन, अमेरिका, नेदरलँड, इंग्लंड, फिनलँड, डेन्मार्क, सिंगापूर, जर्मनी आणि इस्रायलचा समावेश आहे.