महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

स्विस बँकेत भारतीय खातेदारांचा पैसा; केंद्र सरकारला मिळाली महत्त्वपूर्ण माहिती - स्विस बँक अकाउंट नावे

स्विस बँकेत खाते असलेल्या १०० भारतीयांची माहिती स्वित्झर्लंड सरकारने गतवर्षी सप्टेंबरमध्ये दिली होती. यंदाही माहितीचा दुसरा टप्पा केंद्र सरकारला मिळाला आहे.

स्विस बँक
स्विस बँक

By

Published : Oct 9, 2020, 7:01 PM IST

नवी दिल्ली/बेर्ने- काळा पैशाबाबत महत्त्वाची बातमी आहे. स्विस बँकेत भारतीयांनी पैसे ठेवलेल्या बँक खात्यांच्या माहितीचा दुसरा संच केंद्र सरकारला मिळाला आहे. ही माहिती स्वित्झर्लंड सरकारबरोबर झालेल्या करारानुसार स्वयंचलित पद्धतीने सरकारला मिळाली आहे.

स्वित्झर्लंड फेडरल टॅक्स अ‌ॅडमिनिस्ट्रेशनबरोबर भारतासाह जगभरातील ८६ देशांनी करार केला आहे. या करारानुसार केंद्र सरकारला स्विस बँकेत पैसे ठेवलेल्या खातेदांराची नावे, पत्ता इत्यादी माहिती स्वित्झर्लंड सरकारकडून देण्यात येते. गतवर्षी सप्टेंबरमध्ये भारत सरकारला स्विस बँकेत पैसे ठेवलेल्या खातेदारांची माहिती मिळाली होती. काळ्या पैशाविरोधातील लढ्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा असल्याचा दावा यापूर्वी सरकारने केला होता.

सूत्राच्या माहितीनुसार स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची मोठ्या प्रमाणात सरकारला माहिती मिळाली आहे. दरम्यान, स्विस बँकेत खाते असलेल्या १०० भारतीयांची माहिती स्वित्झर्लंड सरकारने गतवर्षी सप्टेंबरमध्ये दिली होती. स्वित्झर्लंड सरकारबरोबर झालेल्या करारानुसार खातेदारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतात.

ABOUT THE AUTHOR

...view details