महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

भारताचा परकीय चलन साठा आता ५०० बिलियन डॉलर्सहून अधिक.. - भारत परकीय चलन साठा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १२ जून रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा हा 507.64 बिलियन डॉलर्सच्या (सुमारे 38 लाख कोटी रुपये) विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. पुनरावलोकनाच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रथमच परकीय चलन साठा 500 बिलियन डॉलर्सच्या पुढे गेला.

India forex reserves crosses 500 Bn mark in June
भारताचा परकीय चलन साठा आता ५०० बिलियन डॉलर्सहून अधिक..

By

Published : Jun 21, 2020, 7:28 PM IST

मुंबई : भारताच्या परकीय चलन साठ्यात निरंतर वाढ होत आहे, हे गेल्या आठवड्यात केवळ 500 बिलियन डॉलर्सच्या पातळीवर गेले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १२ जून रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा हा 507.64 बिलियन डॉलर्सच्या (सुमारे 38 लाख कोटी रुपये) विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. पुनरावलोकनाच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रथमच परकीय चलन साठा 500 बिलियन डॉलर्सच्या पुढे गेला. तर त्यानंतर 12 जून रोजी संपलेल्या आठवड्यात ही वाढ 8.22 अब्ज डॉलर (सुमारे 60 हजार कोटी रुपये) वाढ झाली.

भारताचा परकीय चलन साठा आता ५०० बिलियन डॉलर्सहून अधिक..

तज्ज्ञांच्या मते पुढील कारणांमुळे परकीय चलन साठ्यात वाढ झाली आहे -

  • परकीय चलन मालमत्ता वाढली..

पुनरावलोकनाच्या कालावधीत परकीय चलन संपत्ती देशाच्या परकीय चलन साठ्यातील सर्वात मोठा वाटा आहे. या काळात ती 51.06 अब्ज डॉलर्सने वाढून 468.73 बिलियन डॉलरवर गेली.

  • शेअर बाजारामध्ये गुंतवणूक वाढण्याचे फायदे..

तज्ज्ञांच्या मते भांडवली बाजारात वाढलेली गुंतवणूक आणि चालू खात्यातील तूट कमी झाल्यामुळे परकीय चलन साठा सतत वाढत आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक क्रिया सुस्त झाली आहे. चालू खात्यातील तूट यावर याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की सध्याच्या परकीय चलन साठा आयातीच्या 1 वर्षासाठी पुरेसे आहे.

  • सोन्याच्या किंमती वाढल्या..

भारताच्या परकीय भांडवलाच्या साठ्यामध्ये परकीय चलन साठा (एफसीए), सोन्याचे साठे, विशेष रेखांकन अधिकार (एसडीआर) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील भारतीय राखीव साठा (आयएमएफ) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे देशातील सोन्याच्या साठ्याचे मूल्य 82.10 कोटी डॉलर्सने वाढून 33.173 अब्ज डॉलरवर गेले. याव्यतिरिक्त, एसडीआर मूल्य 1.20 कोटी डॉलर्सने वाढून 1.4544 अब्ज डॉलर्स झाले आहे.

हेही वाचा :चिनी उत्पादनांवर भारतीय बहिष्कार घालणार का? वाचा, सर्वेक्षणातील माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details