नवी दिल्ली - अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये व्यापार करण्याची प्रचंड क्षमता असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले. दोन्ही देशांमध्ये कोणताही व्यापारी वाद नसल्याचे गोयल यांनी म्हटले. ते इंडिया एनर्जी फोरममध्ये बोलत होते.
पियूष गोयल म्हणाले, भारत-अमेरिकेमध्ये मतभेद आहेत. मात्र कोणताही वाद नाही. मतभेद हे कोणत्याही दोन देशांमध्ये असतात. दोन देशामधील संबंधामध्ये थोडीशी अनिश्चितता असणे चांगले आहे. ते चांगल्या द्विपक्षीय संबंधासाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-आरबीआयचा दणका; लक्ष्मी विलास बँकेला १ कोटींचा तर सिंडिकेटला ७५ लाखांचा दंड
अमेरिकन कंपन्यांमध्ये भारतात मोठी गुंतवणूक करण्याची क्षमता आहे. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेबाबत बोलताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था संरचनात्मक बदलानंतर चांगले काम करू शकते, असा विश्वास व्यक्त केला. गेल्या दोन तिमाहीव्यतिरिक्त देशाची अर्थव्यवस्था चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत राष्ट्रीय सकल उत्पन्नाची (जीडीपी) ५ टक्के नोंद झाली आहे. हा गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी जीडीपी राहिलेला आहे.
हेही वाचा-जाणून घ्या, कोण आहेत अर्थशास्त्राचे नोबेल मिळविणारे अभिजित बॅनर्जी