नवी दिल्ली- व्यापार संबंध दृढ करण्याच्या हेतूने भारत आणि मेक्सिको पर्यटनाला चालना देण्याचे आणखीन मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या व्यापार-गुंतवणूक आणि सहकार (बीएचएलजी) या भारत-मेक्सिको द्विपक्षीय गटाच्या पाचव्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकृतरित्या निवेदनात म्हटले आहे.
यात पुढे म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी ऑडिओ-व्हिज्युअल को-प्रॉडक्शन, द्विपक्षीय गुंतवणूकीचा करार, शेती उत्पादनांना बाजारपेठेत प्रवेश आणि सहकार्यात तांत्रिक अडथळे यासारख्या अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच भारत आणि मेक्सिकोचे पर्यटन वाढवण्यासाठी, उभय देशातील लोकांमधील संपर्क वाढविण्यासाठी विविध मार्ग शोधण्यासाठी चर्चा केली.