नवी दिल्ली- अमेरिकेमधून देशात आयात करण्यात येणाऱ्या उत्पादनांवरील शुल्कात लागू करण्याची मुदत केंद्र सरकारने पुन्हा वाढविली आहे. ही मुदत २ मेपर्यंत वाढविली आहे. यामध्ये बदाम आणि दाळींसह २९ उत्पादनांचा समावेश आहे. याबाबतची अधिसूचना केंद्रीय अर्थमंत्रालयाने काढली आहे.
केंद्र सरकारकडून अमेरिकेतील उत्पादनांवर १ एप्रिल २०१८ ला आयात शुल्क वाढविण्यात येणार होते. केंद्र सरकारने जून २०१८ पासून अमेरिकेतील उत्पादनांवर आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय सहाहून अधिक वेळा पुढे ढकलला आहे. मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेने प्राधान्याने देण्यात येणाऱ्या व्यवस्थेतून (जीएसपी) भारताच्या १ हजार ९०० वस्तुंना वगळण्याचा निर्णय घेतला. याबाबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी पुढील महिन्यात अमेरिकेत जाणार आहे.