महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

भारत 'एफडीआय' गुंतवणुकीत जगात नववा; गुंतवणुकदारांचे आकर्षण राहणार कायम

संयुक्त राष्ट्रसंघाची व्यापार आणि विकास परिषदेने (यूएनसीटीएडी) कोरोनाच्या संकटानंतर भारताचा आर्थिक विकासदर कमी, मात्र सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. भारतामधील मोठी बाजारपेठ हे जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करणार असल्याचे यूएनसीटीएडीने म्हटले आहे.

Representative -FDI
प्रतिकात्मक - थेट विदेशी गुंतवणूक

By

Published : Jun 16, 2020, 8:04 PM IST

संयुक्त राष्ट्रसंघ – भारतात थेट विदेशी गुंतवणुकीचे (एफडीआय) 2019 मध्ये 51 अब्ज डॉलर प्रमाण राहिले आहे. त्यामुळे भारत 2019 मध्ये थेट विदेश गुंतवणूकीत निधी मिळविणारा जगात नववा देश ठरल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाची व्यापार आणि विकास परिषदेने (यूएनसीटीएडी) कोरोनाच्या संकटानंतर भारताचा आर्थिक विकासदर कमी, मात्र सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. भारतामधील मोठी बाजारपेठ हे जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करणार असल्याचे यूएनसीटीएडीने म्हटले आहे. भारतामध्ये 2018 मध्ये 42 अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक झाली होती. त्यावेळी भारत जगभरातील आघाडीच्या 20 अर्थव्यवस्थापैकी 12 व्या क्रमांकावर होता. तर आशियात भारत हा एफडीआयमध्ये आघाडीच्या पाच देशांमध्ये होता.

चालू वर्षात जगभरात एफडीआयचे प्रमाण हे गतवर्षीहून 40 कमी होईल, असे यूएनसीटीएडीने अहवालात म्हटले आहे. जगभरातील एफडीआयचे प्रमाण 2005 नंतर प्रथमच 1 लाख डॉलरहून कमी होणार आहे. कोरोना महामारीमुळे आशियातील विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. चालू वर्षात आशियामध्ये एफडीआयचे प्रमाण 45 टक्क्यांनी कमी होईल, असे अहवालात म्हटले आहे. टाळेबंदीदरम्यान देशात लॉजिस्टिक्सचे आव्हान आहे. त्यामुळे एफडीआयच्या मध्यम मुदतीच्या गुंतवणुकीत घसरण होण्याची भारतापुढे जोखीम असणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details