नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाकडून ७ जूनला नवीन प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टल लाँच करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याचे प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टल हे १ जून ते ६ जून या सहा दिवसांसाठी बंद राहणार आहे. याविषयीची माहिती प्राप्तिकर विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
प्राप्तिकर अधिकारी हे प्राप्तिकर फायलिंग पोर्टलमधून विविध माहिती घेण्यासाठी वापर करतात. तसेच प्राप्तिकराचे फायलिंग करण्यासाठी, परतावा पाहण्यासाठी व तक्रारी दाखल करण्यासाठी करदाते वेबसाईटचा वापर करतात. सहा दिवसांसाठी प्राप्तिकर फायलिंग पोर्टल बंद राहणार असल्याने त्याचा वापर करू नये, असा प्राप्तिकर अधिकाऱ्यांनाही सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा-फेसबुकने अमेरिकेपाठोपाठ भारतातही सुरू केले 'कोव्हिड १९ घोषणा' टूल