वॉशिंग्टन - कोरोनाच्या संकटात भारताने राबविलेल्या धोरणाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बळकट पाठिंबा देणार आहे. अभूतपूर्व अशा संकटात आरोग्याच्या मूलभूत क्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे आयएमएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक वित्तीय स्थिरतेसाठी उपाययोजना करत आहे. तसेच महामारीत अर्थव्यवस्था ढासळण्याच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना मदत करणार असल्याचे आयएमएफच्या आशिया आणि प्रशांत विभागाचे संचालक चँग योंग री यांनी सांगितले.
जगातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारताने आरोग्याची समस्या सोडविण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. तसेच गरज असेल तर टाळेबंदी वाढवावी, असेही री यांनी म्हटले आहे.