महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'जी २० राष्ट्रसमुहात भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा सर्वात वाईट परिणाम' - corona impact on Indian economy in 2020

जी २० राष्ट्रसमुहातील इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे. इंग्लंडच्या जीडीपीत एप्रिल ते जूनच्या तिमाहीत २०.४ टक्क्यांची घसरण झाली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा विकासदरात ९.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर युरोपियन युनियनच्या विकासदरात ११.७ टक्क्यांची घसरण झाली आहे.

गीता गोपीनाथ
गीता गोपीनाथ

By

Published : Sep 3, 2020, 4:47 PM IST

हैदराबाद - भारताच्या जीडीपीवर जूनच्या तिमाहीत सर्वात वाईट परिणाम झाल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितले. गोपीनाथ यांनी ट्विटर शेअर केलेल्या आलेखाप्रमाणे एप्रिल-जूनच्या तिमाहीत देशाच्या जीडीपीत २५.६ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे जी-२० राष्ट्रसमुहात भारताचा जीडीपी हा सर्वात कमी राहिला आहे.

जी २० राष्ट्रसमुहातील इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे. इंग्लंडच्या जीडीपीत एप्रिल ते जूनच्या तिमाहीत २०.४ टक्क्यांची घसरण झाली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा विकासदरात ९.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर युरोपियन युनियनच्या विकासदरात ११.७ टक्क्यांची घसरण झाली आहे.

हेही वाचा-अर्थव्यवस्थेची गेल्या ४० वर्षातील सर्वात मोठी घसरगुंडी; पहिल्या तिमाहीत २३.९ टक्क्यांची घसरण

जगभरात केवळ चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर दुसऱ्या तिमाहीत वधारला आहे. मोठ्या प्रमाणात टाळेबंदी असताना चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशांच्या विकासदरात ऐतिहासिक घसरण झाली आहे. चीनच्या जीडीपीची पहिल्या तिमाहीत घसरण झाल्यानंतर दुसऱ्या तिमाहीत जीडीपी मोठ्या प्रमाणात सावरला आहे.

हेही वाचा-महामारीतून सावरेना अर्थव्यवस्था; सलग पाचव्यांदा आठ मुलभूत क्षेत्रांच्या उत्पादनात जुलैमध्ये घसरण

संपूर्ण वर्षभरात मोठ्या प्रमामात आर्थिक विकासदरात मोठी घसरण होण्याची भीती आहे. त्यासाठी देशांनी तयार राहावे, असे गोपीनाथ यांनी सांगितले. नुकतेच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने एप्रिल ते जूनच्या तिमाहीत जीडीपीत २३.९ टक्क्यांची घसरण झाल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. ही गेल्या ४० वर्षात सर्वात मोठी घसरण आहे.

टाळेबंदीमुळे देशाच्या विकासदरात घसरण झाल्याचे आकडेवारीत म्हटले आहे. जीडीपी डाटाबाबत बोलताना केंद्रीय वित्तीय सचिव सुभाष चंद्र गर्ग म्हणाले, की अजून देशाच्या अर्थव्यवस्थेला वेदना सोसाव्या लागणार आहेत. जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीच्या जीडीपीत १२ ते १५ टक्के घसरण होईल, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details