महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

प्राप्तिकर विभागाचे नवीन ई-फायलिंग पोर्टल लाँच; 'या' मिळणार सुविधा - update email on IT portal

प्राप्तिकर विभागाने करदात्यांना डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्र, वैयक्तिक मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी हे नव्याने नोंदणी करण्याची विनंती केली आहे. नवीन पोर्टलवर कंपनी, वैयक्तिक, बिगर कंपनी व टॅक्स व्यावसायिक अशी विविध वर्गवारी देण्यात आलेली आहे.

e filing portal
ई फायलिंग पोर्टल

By

Published : Jun 8, 2021, 3:34 PM IST

नवी दिल्ली- प्राप्तिकर विभागाने सोमवारी नवीन ई-फायलिंग २.० लाँच केली आहे. या वेबसाईटमधून ऑनलाईन प्राप्तिकर परतवा आणि कराची रक्कम भरणे अधिक सोपे होणार आहे.

नवीन पोर्टल www.incometax.gov.in हे असणार आहे. जुने पोर्टल http://incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटच्या जागी नवीन वेबसाईट असणार आहे. करदात्यांना विविध प्रादेशिक भाषांमध्ये नवीन वेबसाईट दिसू शकणार आहे.

हेही वाचा-खासदार नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने केले रद्द

अशी आहे नवीन वेबसाईट

  • प्राप्तिकर विभागाने करदात्यांना डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्र, वैयक्तिक मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी हे नव्याने नोंदणी करण्याची विनंती केली आहे.
  • नवीन पोर्टलवर कंपनी, वैयक्तिक, बिगर कंपनी व टॅक्स व्यावसायिक अशी विविध वर्गवारी देण्यात आलेली आहे. करदात्यांना आयटीआर फायलिंग, परताव्याची स्थिती, कर वर्गवारी हे मेन्यूमध्ये देण्यात आलेले आहेत.
  • आयटी-ई फायलिंग पोर्टलवर वैयक्तिकपणे ८.४६ कोटी जणांनी नोंदणी केली आहे. तर मूल्यांकन वर्ष २०२०-२१ मध्ये ३.१३ कोटी आयटीआर हे ई-पडताळणी झालेले आहेत.
  • नवीन साईट कशी पाहावी, याची माहिती वेबसाईटवरील युझर मॅन्युअल, एफएक्यू आणि व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर चॅटबोट आणि हेल्पलाईन देण्यात आली आहे.
  • वापरकर्त्याने पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डमध्ये ई-प्रोसिडिंग्ज, प्रलंबित मागणी जर वार्षिक माहिती अपुरी असेल तर पेंडिग अॅक्शन टॅबमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा-कचरा वेचणाऱ्याची नशेडीकडून निर्घृण हत्या; नागपुरमधील प्रकार

  • पोर्टलमधील ग्रीव्हन्स मेन्यूमध्ये करदाते हे तक्रार नोंदवू शकतात. तसेच पूर्वीच्या तक्रारीवर केलेल्या अंमलबजावणीची माहिती पाहू शकतात. करदाते हे वैयक्तिक माहिती माय प्रोफाईल मेन्यूमध्ये अपडेट करू शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details