नवी दिल्ली - काळा पैसा बाळगणाऱ्यांविरोधात सरकार काय कारवाई करते, हा अनेकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा विषय ठरला आहे. सरकारने काळा पैसा बाळगणाऱ्याविरोधात काय कारवाई केली, याचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत दिले. प्राप्तीकर विभागाने अघोषित संपत्तीप्रकरणी ३८० जणांना नोटीस पाठविल्याचे सीतारमण यांनी सांगितले. नोटीस पाठविलेल्या व्यक्तींकडे १२ हजार २६० कोटींहून अधिक अघोषित संपत्ती असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली.
प्राप्तीकर विभागाने अघोषित विदेशी संपत्ती आणि मालमत्ता कायद्याअंतर्गत (विदेशी काळा पैसा) कारवाया केल्या आहेत. यामध्ये ३० एप्रिल २०१९ पर्यंत ६८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काळा पैसा (ब्लॅक मनी) कायद्यानुसार ३८० जणांना नोटीस दिल्याचे निर्मला सीतारामण सांगितले.