जयपूर -देशाच्या आयातीचे बिल कमी करू शकणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमध्ये स्फुरदचा (पोटॅश) प्रचंड साठा आढळला आहे. यामुळे देशाला स्फुरदची आयात करावी लागणार नाही, असे सांगितले जात आहे.
जैवभौगोलिक अभ्यासामधून नागौर-गंगानगरच्या नदीपात्रात स्फुरदचा सुमारे २ हजार ४०० दशलक्ष साठा असल्याची पुष्टी मिळाली आहे. हे नदीपात्र श्रीगंगानगर, हनुमानगड आणि बिकानेर जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे. हा स्फुरदचा साठा जगातील एकूण जाहीर करण्यात आलेल्या साठ्याच्या ५ पट असल्याचे राजस्थानचे मुख्य सचिव डी. बी. गुप्ता यांनी सांगितले. गुप्ता हे दिल्लीमधील एका बैठकीत बोलत होते.