नवी दिल्ली- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (शुक्रवार) सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, संसदेत आर्थिक प्रश्नांवर चांगल्या प्रकारे चर्चा होईल अशी आशा व्यक्त केली. अधिवेशनासाठी संसदेत जाण्याआधी ते माध्यमांशी बोलत होते.
'आर्थिक प्रश्नांवर संसदेमध्ये चांगली चर्चा होईल अशी आशा..'
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये देशासमोरील आर्थिक प्रश्नांबाबत सखोल चर्चा व्हावी असे मला वाटते. संसदेच्या आजच्या अधिवेशनात मुख्यत्वे आर्थिक प्रश्नांवर चांगल्या प्रकारचा विवाद आणि चर्चा व्हावी अशी माझी इच्छा आहे, असे मोदी म्हणाले.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये देशासमोरील आर्थिक प्रश्नांबाबत सखोल चर्चा व्हावी असे मला वाटते. संसदेच्या आजच्या अधिवेशनात मुख्यत्वे आर्थिक प्रश्नांवर चांगल्या प्रकारचा विवाद आणि चर्चा व्हावी अशी माझी इच्छा आहे, असे मोदी म्हणाले. आपल्या सरकारची ओळख ही दलित, महिला आणि अत्याचाराचे बळी असलेल्यांचे सशक्तीकरण करणारे अशी आहे. हीच ओळख आम्हाला कायम ठेवायची आहे, असेही ते म्हणाले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण पहा - LIVE : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू..