नवी दिल्ली- देशात कोरोनाच्या संसर्गामुळे आरोग्यासह अर्थव्यवस्थेवरही संकट घोंगावत आहे. अशावेळी आरोग्याच्या संकटावर मात करण्याची देशाची क्षमता आहे, असे बहुतांश भारतीयांना वाटते. मात्र, आर्थिक आघाडीवर लोकांना देशाच्या क्षमतेबद्दल संशय आहे. ही माहिती कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टीआरएटी सर्व्हेतून समोर आली आहे.
आरोग्याच्या संकटावर मात करण्याची भारताची क्षमता असल्याचा ७३ टक्के उपभोक्त्यांना विश्वास आहे. हा विश्वास चांगल्या प्रमाणात आहे. तर देशाच्या आर्थिक क्षमतांवर त्या मानाने कमी म्हणजे ६३ टक्के लोकांचा विश्वास आहे. यामधून दीर्घकाळ असलेल्या वित्तीय आणि आर्थिक परिणामांची लोकांमध्ये भीती असल्याचे दिसून आले. हे सर्वेक्षण 'टीआरए कोरोनाव्हायरस कन्झ्म्युअर इनसाईट २०२०' या नावाने प्रसिद्ध झाले आहे.