महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जीएसटी परिषदेची 17 सप्टेंबरला होणार बैठक; या विषयांवर होणार चर्चा - Nirmala Sitharaman

17 सप्टेंबरच्या जीएसटी परिषदेत राज्यांना देण्यात येणारा जीएसटी मोबदला व कोरोनाशी निगडीत वस्तुंवरील जीएसटी दराबाबत विचार केला जाणार आहे. राज्यांसाठी ही जीएसटी परिषद महत्त्वाची असणार आहे. याबाबत सविस्तर वाचा.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

By

Published : Sep 4, 2021, 3:06 PM IST

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 17 सप्टेंबरला लखनौमध्ये जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनासंबंधित वस्तुंवरील दराबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने ट्विट करत 17 सप्टेंबरला लखनौमध्ये जीएसटी परिषद होणार असल्याचे म्हटले आहे. ही 45 वी बैठक होणार आहे. मागील जीएसटी परिषद ही 12 जूनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली होती. रेमडेसिवीर औषधांवरील, वैद्यकीय ऑक्सिजन व ऑक्सीजन कन्स्ट्रेटवरील जीएसटी करात कपात करण्यात आली होती.

हेही वाचा-जावेद अख्तर यांनी तालिबानची केली आरएसएससोबत तुलना

17 सप्टेंबरच्या जीएसटी परिषदेत राज्यांना देण्यात येणारा जीएसटी मोबदला व कोरोनाशी निगडीत वस्तुंवरील जीएसटी दराबाबत विचार केला जाणार आहे.

हेही वाचा-70 केंद्रीय मंत्र्यांचा जम्मू-काश्मीर दौरा; काय आहे जम्मू-कश्मीरसाठी मोदीचा 'फ्यूचर प्लान'

मंत्रिस्तरीय समितीने केलेल्या शिफारशीप्रमाणे जीएसटी परिषदेत घेतला होता निर्णय

विरोधी पक्षांकडून कोरोना लशींवरी जीएसटी माफ करावा, अशी मागणी केली जात होती. मात्र, जीएसटी परिषेदने त्यामध्ये बदल करण्यास मान्यता दिली नव्हती मंत्रिस्तरीय समितीने केलेल्या शिफारशीप्रमाणे जीएसटी परिषदेने जीएसटी कपातीचा निर्णय घेतला आहे. नवीन जीएसटी दर हे सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत रुग्णवाहिकांवरील जीएसटी दर हा 28 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर इलेक्ट्रिक फर्नेस आणि तापमान मोजण्याच्या साधनांवरील जीएसटी दर कमी करून 5 टक्क्यांपर्यंत केला आहे.

हेही वाचा-अनिल देशमुख यांच्या वकीलासह सीबीआयच्या उपनिरीक्षकाला आज न्यायालयात केले जाणार हजर

ABOUT THE AUTHOR

...view details