नवी दिल्ली- देशातील सर्व राज्यांचा डिसेंबर ते मार्चदरम्यानचा जीएसटी मोबदला रखडल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. त्यांनी ही माहिती आत्मनिर्भर अशी संकल्पना असलेल्या आर्थिक पॅकेजचा अखरेचा टप्पा घोषित करताना माध्यमांनी दिली.
निर्मला सीतारामन म्हणाल्या, की आम्ही रखडलेल्या जीएसटी (वस्तू व सेवा कर) मोबदल्याबाबत राज्यांशी नियमित बोलत आहोत. याबाबतची जीएसटी परिषदेत सविस्तर चर्चा झाली आहे. ठराविक राज्यांचा जीएसटी रखडलेला नाही. सर्व राज्यांच्या डिसेंबर २०२० ते मार्च २०२० पर्यंतचा जीएसटी मोबदला रखडलेला आहे.
हेही वाचा-आत्मनिर्भर पॅकेज : कर्ज मर्यादा वाढविल्याने राज्यांना ४.२८ लाख कोटी मिळणार - केंद्रीय अर्थमंत्री
जीएसटी कायद्यानुसार महसुलाच्या भरपाईपोटी केंद्र सरकारने राज्यांना जीएसटी मोबदला द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारने महसूल संकलन कमी झाल्याने चालू आर्थिक वर्षात ऑगस्टपासून जीएसटी मोबदला देण्यास उशीर केला आहे.